गावगाड्याच्या राजकारणात पॅनलचा खेळखंडोबा
धनंजय गुंदेकर - 9689043949
असं म्हणतात कि लोकसभा एकवेळ सोपी मात्र गावात सरपंच होणे अवघड. याच पार्श्वभूमीवर आगामी तीन-चार महिन्यांवर येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये यंदा जरा नाविन्यता आहे. भाजप सरकारने कमळाबाईला घराघरात पोहोचविण्यासाठी
नगरपालिकेच्या धर्तीवर जनतेतून सरपंचपदाचा निर्णय जाहीर करत सरपंचाला सर्वाधिकार बहाल केले. यातून सुरुवातीला अत्यंत महत्व असणाऱ्या पॅनलपद्धतीला धक्का बसून सरपंचाचा एकमुखीला सत्तेला बळकटी देत संघात्मक राजकारणाला खोडा घातला आहे. यातुन पक्षीय राजकारणाला प्राधान्य मिळून गावागावातील ग्रामपंचायतच्या सर्वपक्षीय आघाड्या यामुळे आता मोडीत निघून पक्षाला हितकारी आघाड्या बनवल्या जात आहेत किंवा बनत आहेत. मात्र गावागावात अनेकविध पक्षांना आता निवडणूक चिन्हांबाबत संभ्रम अजूनही तसाच आहे. निर्णय तर झाला आहे कि सरपंच जनतेतून होणार.
भाजपने नागरपालिका निवडणुकांच्या यशानंतर पक्षविस्तारासाठी या निर्णयाची अंमलबजावणी कल्याचे बोलले जाते तसे याबाबत राजकीय विश्लेषक विश्लेषणही करतात मात्र यातील पक्षाच्या अधिकृत चिन्हांबाबत स्पष्टता नसल्याने गावगातील पॅनलच्या रचनेचा अडकूत्या कायम तसाच राहिलेला आहे. या चिन्हांबाबतच्या निर्णयाच्या घोषणेअभावी सर्व गावपुढाऱ्यांचे लक्ष आता ग्रामविकास मंत्रालयाकडे लागले आहे. या निर्णयावर गावातील कोणत्या पक्षासोबत आघाडी करायची याबाबतच निर्णय होऊन सत्तास्थापनेचे प्रयत्न होणार आहेत.
सत्ताधारी पॅनलला बाजूला काढण्यासाठी सरपंचपदाचा उमेदवार सर्वसमावेशक नेतृत्व असणारा असणे अत्यंत गरजेचे बनलेले असून यातुनच गावातील कौल कुणाकडे आहे कळून येणार आहे. मात्र जनतेतून सरपंच या निर्णयाने एका गावात अधिक उमेदवार उभे राहिल्यानेही पॅनलपद्धतीच्या तोट्यांचा सामना करावा लागणार आहेच. एका गावात जर १ हजार मतदार असतील आणि ८ उमेदवार उभे असतील तर तेथे विजयासाठी ३०० च्या जवळपासच मतदान गरजेचे आहे.
यातून जात, कुटुंब, नातीगोती, भावकी आणि सरतेशेवटी पक्ष हे सर्वच घटक महत्वाचे बनून जातात. मोठ्या मतदार संख्या असणाऱ्या घरातून सदस्य निवडले जाणाऱ्या पॅनलपद्धत्तीला मात्र आता थेट जनतेतून सरपंचपदाने महत्व राहिलेले नाही.
गावगाड्याच्या राजकारणात विकासापेक्षा आणि लोकांच्या कामापेक्षा राजकीय वजन, वयक्तिक संबंध, भांडणे, जात, भावकी, मित्र, नाते, पैसा, स्वभाव, राहणीमान असे कितीतरी गोष्टींची दखल घेत सरपंचाची निवड केली जाते. जो मतदार सरपंचपदाच्या निवडीवेळी चाणाक्ष, चौकस राहतो तो मात्र इतर वस्तू खरेदी, लग्न इत्यादींसाठी चौकस आणि चाणाक्ष राहत
नसल्याचे निरीक्षणे आहेत. गावगाड्याच्या राजकारणात द्वेष, मत्सर, हेटाळणी या गोष्टी अधिक दिसून येत असून सक्षम पर्यायाना बाजूला सारून नातेसंबंध आणि पैश्याला अधिक महत्व दिले जाते मात्र आता नवीन पिढी आली आहे ज्या पिढीला शिक्षणामुळे गावगाड्याच्या राजकारणचा अजूनही बरचसा संबंध न आल्याने ते सुधारणावादी भूमिका घेऊन असतात.
मात्र या नव्या सुधारणा, परिवर्तनवादी पिढीला धक्का बसतो त्या पॅनलरचनेने आणि मतदारांच्या पैस्यावर विकण्याणे. बऱ्याचशा गावातील मतदार हे कामानिमित्त बाहेरगावी मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा विविध ठिकाणी स्थायिक झालेले असतात. त्यांना गावच्या विकासाचे काहीही देणेघेणे नसते त्या मतदारांना येण्याजाण्यासाठी तसेच खर्च
करण्यासाठी पैसे दिले कि ते कोणालाही मतदान करतात आणि या अशा गैरजबाबदार मडतानाची टक्केवारी हि २० % पेक्षा अधिक असून छोट्या गावातील ग्रामपंचायतीचा निर्णय या लोकांच्या हातात अधिक असतो!
अशा कितीतरी अट्टाहासी जमावाजमवीतून प्रतिमानिर्मिती होते. गावस्तरावर एखाद्याची दहा कामे केली आणि आपल्याकडून १ काम जरी नाही झाले तरी पुढील जो कोणी ग्रामस्थ असतो तो एकतर नाराज होतो अथवा थेट आपल्या विरोधकांकडे जातो. या सर्व गोष्टींतून पुढे तयार होते ते गावचे नेतृत्व! जर कोणी गावच्या सरपंचाचे लोकांना आपल्याकडे आकर्षित ठेवण्याचे धोरण मॅनेजमेंट कोशल्यातून पहिले तर त्यापुढे एमबीए पदवीधारक फिका पडेल असे त्यांचे धोरण असते! गावचा सरपंच गावचा जसा प्रथम नागरिक असतो तसा त गावच्या अडीअडचणी, तंटे, समस्या, सुखदुःखाचा भागीदारही असतो. सरपंचानी जर गटातटाचे धोरण स्वीकारउन सत्ताकारभार चालवला तर गावात राजकारण माजून गाव नासायला सुरुवात होते. ग्रामपंचायत निवडणूक हि मराठवाड्यात धुरवडीच्या सनसारखी असते. या सणात जसे कोणीही काहीही बोलते तसे या निवडणुकीतही आरोपांची धूळधा
ण उडते. भाऊ भावाच्या विरोधात जातो. हाणामारी होते, अन्याय होतो , धमक्या दिल्या जातात, ब्लॅकमेल केले जाते, खोट्या केसेस दाखल होतात यापुढे लागते इलेक्शन आणि त्यात विजय महत्वाचा बनून जातो अन्यथा पराजित गटाला ५ वर्षे पराभूत मानसिकतेत जगावे लागते. मराठवाड्यातील कित्येक गावांमधील विकास अभिप्रेत मंडळी पराभवानी इतकी खचतात कि त्यांना गाव सोडून जावे लागते.
ज्याच्या खिशात पैका त्याचेच ऐका ,
अशा धोरणामुळेही गावगाड्याच्या विकासाला खोडा बसून संधीसाधू नेतृत्वाला प्राधान्य मिळते. या ग्रामपंचायत निवडणुकांनी गावचेगावपण हेरावून घेतले आहे. मात्र आता पुन्हा संधी आहे नवनवनिर्माणाची ! मात्र सरपंच होण्यास इच्छुकांनी वरील माहिती डोस्क्यात फिट्ट करून घेणे अत्यंत गरजेचे असून मतदानाच्या आदल्या रात्री आपल्या कार्यकर्त्यांच्या घरात विरोधकांचे समर्थक न घुसून देणे हा कानमंत्र सदैव ध्यानात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे बाकी या थेट निर्णयामुळे पॅनलचा मात्र खेळखंडोबा झाला!




