आ. मेटेंच्या शल्याचे देवेंद्रांना सोयरेसुतक !
सदैव मुख्यमंत्र्यांशी बोलतो म्हणत फडणवीसांशी सोयरेसुतक दाखवणाऱ्या आ मेटेंना आजपर्यंत मंत्रिपदाबाबत बाजावरच्या आहारावरच समाधान मानावे लागले आहे. अल्टिमेटमवर अल्टिमेटम देऊनही मंत्रिपद न मिळालेले पाहून आता आ विनायक मेटेंचा राजकीय धोरणी दौरा शिवस्मारक अन मराठा आरक्षणावर पुन्हयांदा वळला आहे खरा मात्र आ मेटेंच्या शल्याचे देवेंद्रांना सोयरसुतक नसल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे.
------------------------------------------------------------
धनंजय गुंदेकर - 9689043949
-------------------------------------------------------------
महाराष्ट्रात २०१४ साली महायुतीचे सरकार सत्तेवर आले. नावालाच महायुती असणाऱ्या सरकारात सर्वाधिक सत्ता भाजपाची, नंतर शिवसेनेची अन किरकोळ पदे महायुतीतील घटकपक्षाला देण्यात आली. याच महायुतीतील शिवसंग्राम संघटनेला शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि स्व गोपीनाथ मुंडे यांनी मराठा आरक्षण, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महायुतीत सामावून घेतले. असंतुष्ट मराठा गटाच्या नेतृत्वातून स्थापन झालेल्या शिवसंग्राम संघटनेला महायुतीत २ जागा मिळाल्या मात्र या दोन्हीपैकी एक आली अन एका जागेवर खुद्द मेटेंनाच पराभव स्वीकारावा लागला. विधानसभेनंतर भाजपने मेटेंना विधानपरिषदेवर आमदार केले. शिवस्मारक समितीचे अध्यक्षपद बहाल करत राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला. मात्र शिवसंग्राम संघटनेला अर्थातच भारतीय संग्राम परिषदेला मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले. आ विनायक मेटे हे गेल्या २ - ३ वर्षांपासून भाजप सरकारला मंत्रिपदासाठी अल्टिमेटम देत आहेत मात्र या अल्टिमेटमचा भाजपवर कसलाच परिणाम अद्यापपर्यंत झालेला नाही. दोन दिवसांपूर्वी आ विनायक मेटेंनी एका युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सरकारवर मराठा आरक्षण, शिवस्मारक कामांबाबत चालढकलपनाचा आरोप करत सरकारच्या धोरणांबाबत सरकरविरोधात बरसताना आ मेटेंच्या बरसण्याची पर्वा कुणाला हा प्रश्न पडतो ?
आ मेटेंकडून मंत्रिपदासाठी देण्यात आलेले अल्टिमेटम केराच्या टोपलीत
भाजपने टाकलेले असताना आता आ मेटे सरकारला पुन्हा मराठा आरक्षणासाठी कैचीत सापडणार आहेत. सोबतच अखंड महाराष्ट्राचेच नव्हे तर अवघ्या जगाचे श्रध्दास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवस्मारक अरबी समुद्रात व्हावे यासाठी भाजपा सरकारने निवडणूक कालावधीत वचन दिले, परंतु सत्ता येऊन सव्वा तीन वर्षे होत आले तरी हे काम मार्गस्थ होत नसून दस्तुरखुद्द पंतप्रधानांनी जलपुजन करूनही अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामाला गती मिळत नसल्याने शिवस्मारक समितीचे अध्यक्ष असलेले आ. मेटे कमालीचे संतापले.
मंत्रिपदाबाबत द्रांक्षे आंबट अशी म्हणण्याची वेळ आलेले आ मेटे
आलेली असल्याने आता सत्तेच्या लाटेतून काहीच हाती लागत नसल्याचे पाहून पुन्हा आरक्षण आणि शिवस्मारक प्रश्नाकडे वळले आहेत. एखादा प्रश्न कधीच सुटणारा नसेल आणि त्याच्यावर राजकीय पोळी सदैव भाजून निघत असेल तर त्या प्रश्नाचा राजकीय धोरणासाठी वापर चांगल्या प्रकारे केला जाऊ शकतो. या उक्तीला अनुसरूनच राज्याचे अन देशाचे राजकारण आजपर्यंत चालत आलेले आहे. राममंदिर, गरीची हटाव, रेल्वे, आरक्षण असे कितीतरी मुद्दे क्लिष्ट आहेत. याच मुद्द्याला हाताशी धरून राजकारण केले तर त्याच्यावर राजकीय स्वार्थाची पोळी चांगल्या प्रकारे भाजून तर निघतेच मात्र ती पोळी अनादी काळापर्यंत टिकून स्वादिष्टहि असते. याच मुद्द्यांच्या वापरावरून अन अस्मितेच्या आवाहनातून मतपेटी भरवली जाते. एखाद्या राजकीय नेतृत्वाच्या उपद्रवमूल्यावरून त्याची राजकीय किंमत ठरते. सध्या आ मेटे यांची स्थिती काही मोजक्या ठिकाणीच उपयोगी आहे.
मराठा क्रांती मोर्च्याने मराठा युवकांना प्रगल्भ केलेले आहे. राजकीय स्वार्थ मराठा जणांनी जाणला आहे.
आज शिवस्मारक उभारणीवरून सरकारवर बरसताना शिवभक्तांचा संताप सरकारला व्यक्त करत असलात तरी आपल्या या संतापाची पर्वा सरकारदरबारी होते का हा कळीचा प्रश्न आहे. याआधीही आपण बऱ्याचदा सरकारला धारेवर धरले आहे. १९९५ साली आपण स्व गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत युतीच्या सत्तेत होतात. तेव्हाही त्या सरकारने आपल्या मागण्यांची पर्वा केली नव्हतीच. आताच्या सरकारने महायुतीत सहभागी होण्यासाठी मागण्या मंजूर करू म्हणत स्टॅम्प पेपरवर लिहून दिले होते. या महायुतीतील शिवसेनेलाच भाजपा विश्वासात घेत नाही तर शिवसंग्रामच्या बरसण्याने कसला तो फरक ! येत्या वर्षभरात निवडणुकीचे पडघम वाजणार आहेत. सरकारदरबारी आगामी महायुतीत जास्तीत जास्त जागा पदरी पाडण्यासाठी आ मेटेंना आता राज्यभरात चर्चेत राहणे आवश्यक आहे. बीड, ठाणे, रिसोड, यांसह इतर जागांवर शिवसंग्रामचे अधिकृत उमेदवार भाजपासोबतच्या युतितुन पाडून घेण्यासाठी आ मेटे सत्तांतर्गत विरोधाच्या लक्ष्मणरेषेला पार न करताच भाजपाला आपले उपद्रव मूल्य दाखवून देण्यासाठी तर हि उठाठेव करत नाहीत ना अशी चर्चाही जनमानसात सध्या सुरु आहे. शिवजयंतीच्या औचित्यावर शिवभक्तांकडून शिवस्मारकाच्या कामाबाबत सरकारला विचारणा झाली. मोर्चे आंदोलनातून मराठा आरक्षणाची मागणी पुढे आली. समाजाच्या मागण्यांसाठी आपण सतर्क असून याबाबत मुख्यमंत्र्यांशी सातत्याने संपर्क ठेऊन असल्याचे आ मेटे भासवत आहेत मात्र या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आ मेटे फक्त मीडियात चर्चेत राहतात यापुढे काहीच नाही असा आजपर्यंतचा इतिहास आहे.......