जनसामान्यांसाठी सोशल मीडिया बनतेय आयुध
वृत्तवाहिन्यांना सिद्ध करावी लागणार आपली पात्रता
कालपासून एक वृत्तवाहिनीच्या विरोधातील सोशल मीडियातील ट्रेंडने अख्खा मिडीया गदगदून हादरला असं म्हणता येत नाही तरी पण 'जागा' मात्र झाला असावा असं चित्र दिसत आहे. समाजात एखाद्या वृत्तवाहिनीच्या किंवा प्रसारमाध्यमाच्या विरोधातील समाजातील प्रबळ विरोध पहिल्यांदाच महाराष्ट्रात दिसून आला.
मुद्रित माध्यमे कौतुकास पात्र
देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीपासून ते आजपर्यंत चिरंतन विश्वासार्हता लाभलेल्या प्रिंट मीडिया (मुद्रित माध्यमे) आजपर्यंत निष्कलंकपणे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे कार्य अव्याहतपणे करत असून लोकशाहीस बळकटीच देत आले आहेत. नव्या तंत्रज्ञानात लोकांनी आपलेसे केलेले इलेकट्रोनिक प्रसारमाध्यमे पेड न्यूजला बळी पडली मात्र प्रिंट मीडियात या माध्यमातील कॅन्सरचा एवढा काही शिरकाव झाला नाही. आज घडीला वृत्तवाहिन्यांवरील सोशल मीडियातील टिकेमधून मुद्रित माध्यमे टीकाकारांनी वगळली असून वृत्तवाहिन्यांना प्रिंट मीडियाचा आदर्श घेण्याबाबत नेटिझन्सकडून सल्ला दिला जात आहे.
वृत्तवाहिन्यांना सिद्ध करावी लागणार आपली पात्रता
धनंजय गुंदेकर - 9689043949
![]() |
| या वृत्तवाहिनीच्या विरोधात नेटकऱ्यानी चळवळच उभी करून आपला विरोध ट्रेंडने दर्शवला |
कालपासून एक वृत्तवाहिनीच्या विरोधातील सोशल मीडियातील ट्रेंडने अख्खा मिडीया गदगदून हादरला असं म्हणता येत नाही तरी पण 'जागा' मात्र झाला असावा असं चित्र दिसत आहे. समाजात एखाद्या वृत्तवाहिनीच्या किंवा प्रसारमाध्यमाच्या विरोधातील समाजातील प्रबळ विरोध पहिल्यांदाच महाराष्ट्रात दिसून आला.

सोशल मीडियात योगींच्या दिनचर्या अन इतर गोष्टी दाखवल्याने देशभरात फक्त योगीच आहेत अन बाकीचे काहीच घडत नाही का असा सवाल जनसामन्यांकडून विचारला जात आहे.
सोशल मीडियाला आजपर्यंत उथळ माध्यम समजले जायचे परंतु आता त्याच्याही पुढे इलेकट्रोनिक मीडिया जात असल्याने सोशल मीडियातूनच आरोप होत आहे. स्वतःला व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून सुरुवातीला रूढ झालेला सोशल मीडिया सध्या लोकशाहीस भक्कम करणारा पाचवा स्तंभ म्हणून उभारत असल्याने चौथ्या स्तंभाला याकडे डोळेझाक करून जनभावनेच्या प्रतिनिधीत्वाचे ठेकेदार म्हणवून घेता येणार नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकशाहीच्या सदृढीकरणाचा आधारभूत असा मधला स्तंभ आता सुजाण नागरिकांसाठी व्यवस्थेच्या विरोधात शस्र उगारण्यासाठी सज्ज आहे. भारतातील इलेकट्रोनिक मीडियातील काही मोजक्या संस्थांच्या बातमीदारीतला उथळपणा, मनोरंजनीकरण, सत्ताधाऱ्यांशी लगड, तडजोड, भेदभाव या अवगुणांमुळे जनतेमध्ये अविश्वास दृढ होत चालला आहे. अशा परिस्थितीत जनसामान्यांसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भावना व्यक्त करणे सहज शक्य बनलेले असताना जनसामान्यांकडून याचा वापर आतापर्यंत सरकार, व्यवस्थेच्या विरोधात असतानाच आता थेट इलेकट्रोनिक मीडियातील वृत्तवाहिन्यांवरही होताना आज दिसून येत आहे.
सोशल मीडियात योगींच्या दिनचर्या अन इतर गोष्टी दाखवल्याने देशभरात फक्त योगीच आहेत अन बाकीचे काहीच घडत नाही का असा सवाल जनसामन्यांकडून विचारला जात आहे.
आज जो वृत्तवाहिनीच्या विरोध होत आहे तो मुळात इलेकट्रोनिक मीडियातील वृत्तवाहिनीचाच आहे असे नाही तर हा विरोध देशातील सर्वच माध्यमांसाठी अंतर्गत बदल घडवण्याचा संकेत आहे. देशातील मुद्रित माध्यमे आपली विश्वासार्हता आजही टिकून आहेत. मुद्रित माध्यमातील सहज पुरावे उपलब्धता, बळकट व्यवस्था, वैचारिक सुसंगती, विवेकी बातमीदारी, अभ्यासपूर्ण मांडणी या अशा कितीतरी गुणांमुळे मुद्रित माध्यमे आपली विश्वासार्हता अजूनही बळकट बनवत आहेत मात्र प्रसारमाध्यमांची दुसरी बाजू असणारी इलेकट्रोनिक माध्यमे आतापर्यंत लोकशाहीतील चारच स्तंभ आहेत आणि लोकभावनेचा नेतृत्वाची ठेकेदारी आपल्याकडेच असल्यासारखे वागत असताना आज सोशल मीडिया त्यांच्याच विरोधात पाचवा स्तंभ बनत व्यवस्थेसोबत हक्कासाठी लढताना दिसून येत आहे. बाकी माध्यमांवरील टिका टिपण्ण्या व आरोप प्रत्यारोप हे आता लोकभावना समजून पुढं चालत रहावं की बदलावं एवढी समज चौथ्या स्तंभाला यावी.
![]() |
| वर्तमानपत्राला आपलं नियत कर्तव्य चोख पार पाडायचं असेल तर त्याचं धोरण एकला चालो रे.. असंच असायला हवं. याचा अर्थ असा की वर्तमानपत्रानं आपल्याबरोबर कोण आहे कोण नाही याची फिकीर करू नये. |
देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीपासून ते आजपर्यंत चिरंतन विश्वासार्हता लाभलेल्या प्रिंट मीडिया (मुद्रित माध्यमे) आजपर्यंत निष्कलंकपणे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे कार्य अव्याहतपणे करत असून लोकशाहीस बळकटीच देत आले आहेत. नव्या तंत्रज्ञानात लोकांनी आपलेसे केलेले इलेकट्रोनिक प्रसारमाध्यमे पेड न्यूजला बळी पडली मात्र प्रिंट मीडियात या माध्यमातील कॅन्सरचा एवढा काही शिरकाव झाला नाही. आज घडीला वृत्तवाहिन्यांवरील सोशल मीडियातील टिकेमधून मुद्रित माध्यमे टीकाकारांनी वगळली असून वृत्तवाहिन्यांना प्रिंट मीडियाचा आदर्श घेण्याबाबत नेटिझन्सकडून सल्ला दिला जात आहे.




Media is a voice of common people. It is fourth column of Democracy. But now a days some Media personals are selling their fidelity specially electronic media, but it is unfortunate... They are loosing the Faith of people......
ReplyDeleteYa absolutely right sir
ReplyDeleteYa absolutely right sir
ReplyDeletenice dhanu
ReplyDeletenice dhanu
ReplyDelete