जिल्हात राष्ट्रवादी धनंजय मुंडेंच्या नेतृत्वामध्ये सरकारविरोधात एकवटली !
राजकीय नेतृत्वाचे एकक हे जिल्हास्तरावरून चालवले जाते. जिल्हाभरात प्रभावशाली ठरणाऱ्या नेतृत्वाच्या हातात त्या त्या संघटना - पक्षाचा कारभार असतो. २०१४ च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे नेतृत्व एकक हे विधानसभा क्षेत्रापुरते मर्यादित होते. कुणी कुणाला सहकार्य करण्यापेक्षा पाण्यात बघण्याचा प्रकार अधिक घडत होता. यातूनच राष्ट्रवादीची जिल्ह्यामधील सर्वाधिक घडताना दिसून आली. २००९ च्या निवडणुकींमध्ये राष्ट्रवादीच्या ६ पैकी ५ जागा होत्या तर हाच निकाल २०१४ साली ६ पैकी फक्त १ च लागला. एवढी पडझड राज्यातही झालीच मात्र हा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असताना ६ पैकी १ च जाग्या मिळण्यास कित्येक कारणे होती. त्यात मोदी - मुंडे लाट, राष्ट्रवादीविरोधातील अँटी-इन्कबंसी, भ्रष्टाचाराचे आरोप अन जिल्हाव्यापक नेतृत्वाचा अभाव. याच अनुभवाचे उत्तर आता हल्लाबोल यात्रा, विधानपरिषदेतील करारा विरोध अन जिल्ह्यातील राष्ट्रवादीची एकसंध बांधण्यात आलेल्या मोटेमधून धनंजय मुंडेंच्या रूपाने राज्यासह जिल्हाभरातून पुढे आलेले आहे. बीड जिल्ह्यात आघाडीच्या सत्तेच्या काळात

२ मंत्रीपदे आ जयदत्त क्षीरसागर आणि सुरेश धस
यांच्यारूपाने होती. मात्र या दोन्ही माजी मंत्र्यांना आपला मतदारसंघ निवडणुकीच्या वेळी सोडता आला नाही. आ क्षीरसागर कसेबसे जिंकलेही मात्र सुरेश धस पराभूत झाले. प्रकाश सोळंके, बदामराव पंडित, मुंदडा यांना पक्षांतर्गत गटबाजीचा सामना करावा लागल्यानेही त्यांचा पराभव झाला अशीही चर्चा आहे. एकंदर राष्ट्रवादीकडे जिल्हाभराची कमांड सांभाळणारे नेतृत्वच नव्हते. त्यामुळे पराभवाची समीक्षा अन चिंतन हे जिल्हाव्यापी अन प्रभावी नेतृत्वाच्या आभावाजवळ येऊन ठेपले होते. २००९ अन २०१४ विधासभा निवडणुकांपेक्षा आगामी प्रस्तावित २०१९ च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची रणनीती वेगळी असणार आहे. माजलगाव, परळी, केज, बीड, गेवराई या मतदारसंघात निर्विवादपणे राष्ट्रवादी आपल्या संपूर्ण ताकदीनिशी विधानसभेचा गड सर करण्यासाठी पुढे सरसावली आहे. या सर्व राजकीय धोरणात नेतृत्वस्थानी एकमताने धनंजय मुंडे पुढे असल्याचे सर्वांना दिसून यायला लागले आहे. २०१४ च्या निवडणुकीपेक्षा आगामी विधानसभेत धनंजय मुंडे जिल्हाभरात राष्ट्रवादीचा प्रचार उमेदवाराच्या खांद्याला खांदा लावून गटतट बाजूला सारून करणार आहेत हे राष्ट्रवादीच्या जमेच्या बाजूदाखवणारे ठरत आहे.
दीर्घकालीन सत्तेने २०१४ च्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात मतदारांमध्ये नाराजी होती. लोकांनी भाजपच्या बाजूने आपला कल दाखवला. जनतेला बदल हवा होता. मात्र ज्या प्रचंड अपेक्षेने जनतेने भाजपच्या बाजूने कौल दाखवला त्याच प्रचंड गतीने भाजपच्या धोरणाबाबत जनतेच्या मनात रोष निर्माणही झाला. जिह्यातील स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडे जनतेचा बराच कौल होता मात्र भाजपने यात जादूच्या कांडीने जनभावना दुखावली. भाजपकडून जनभावनेची हेटाळणी करण्यात आली हे दाखवून दिले धनंजय मुंडेंनी. पक्षाच्या आदेशाला डावलून बंडखोरी करणाऱ्यांची हकालपट्टी करून त्या त्या पक्षात पक्षवाढ करण्याचा हातखंडा धनंजय मुंडे यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे असल्याचे बोलले जाते व ते त्यांनी करूनही दाखवले आहे.
बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबे, महेंद्र गर्जे, विजयसिंह पंडित, यांसारखी तरुण टीम अन अमरसिंह पंडित, प्रकाश सोळंके यांचे मार्गदर्शन सहकार्य धनंजय मुंडे यांना पदोपदी मिळत असल्याने जिल्ह्यासह राज्यभरात धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाचा झंझावात सरकारविरोधातील रोष बनत फिरत आहे. स्व गोपीनाथ मुंडेंमधील संघर्ष लोकांना धनंजय मुंडेंच्या रूपात दिसतोय आणि तशी चर्चाही आता राजकीय गप्पांमध्ये रंगू लागली आहे. विदर्भापाठोपाठ मराठवाड्यातील सरकरविरोधी हल्लबोल यात्रेतून विरोधी पक्षनेता या नात्याने धनंजय मुंडे सरकारच्या धोरणाची लक्तरे उडवतानाच मराठवाड्यात अन बीड जिल्ह्यात वयक्तिक लक्ष देत पक्षविस्तारालाही प्राधान्य देत आहेत. जातपात, धर्म, भाषा यापुढचे राजकारण धनंजय मुंडेंनी अंगिकारल्याने त्यांच्या प्रभावात आजची युवा पिढी येत आहे. आणि हाच धागा आहे जिल्ह्यातील पक्षाच्या एकवटण्याचा !
बीड जिल्ह्यात भाजपाचा अंमल हा एकछत्री आहे तर राष्ट्रवादीचा एकरूपी असेल असाच प्रयत्न सध्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून सुरु झालेला दिसून येत आहे. येत्या विधानसभेत दोन्ही पक्षाकडे राज्यासह जिल्ह्याव्यापी नेतृत्व असल्याने टक्कर तगडी ठरेल. मात्र २०१४ च्या निवडणुकींमधील नेतृत्व अभावाची उणीव यावेळी धनंजय मुंडे यांच्यामुळे भासणार नसली तरी त्यांना अजूनही बरेच आव्हाने आहेत. आष्टी मतदारसंघामध्ये प्रबळ उमेदवार, गेवराईत शिवसेनेच्या बदामराव पंडितांचा आघाडीवर असलेला झंझावात थोपवणे, बीड विधानसभेतील काका - पुतण्यांचा संघर्ष, मुंदडांची नाराजी, परळीत स्वतःचा विजय. आपले नेतृत्व सिद्ध करण्यासाठी अन जिल्ह्याचा अन राज्याचा चेहरा होण्यासाठी धनंजय मुंडेंना या जिल्ह्यात २००९ प्रमाणे एकहाती राष्ट्रवादीची सत्ता आणावी लागेल मात्र त्यासाठी भाजपा अन शिवसेना या दोन्ही पक्षाची नाकेबंदी करणे आवश्यक आहे.
वेध आगामी विधानसभेचा - धनंजय गुंदेकर 9689043949

No comments:
Post a Comment