अर्ध्यावरती डाव मोडला,
अधुरी एक कहाणी...
संभाजी कदमांचे स्वप्न अधुरेच राहीले......
धनंजय गुंदेकर
फेब्रूवारी 2017 साली पोस्टींग दिल्लीला होणार होती,तिकडे जाण्यासाठी रिझर्वेशन करण्याची तयारीही सुरु झाली होती.एकदोन दिवसांत ते ही पुर्ण झाले असते.कुटुंबियांसह दिल्लीला जाण्याच्या संभाजी कदमांच्या मानसावर नियतीची सारीपाट सुरु झाला, मंगळवारी पहाटे पाकाड्यांच्या दहशतवाद्यांकडुन झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मराठा लाईट इन्फंन्ट्रीचे भुमिपुत्र संभाजी यशवंत कदम देशासाठी शहीद झाले.देशभर या बातमीने शोककळा पसरली.या अर्ध्यावरतीच्या डाव मोडल्याने, एक अधुरी कहाणी पुन्हा नांदेडमध्ये घडुन आली...........
सुटीवर आल्यानंतर बालाजीच्या दर्शनाला जाण्याचे आश्वासन संभाजींनी आपल्या आईला दिले होते परंतु आता त्या आईने कुणाकडे पाहायचे... पोटचा गोळा म्हणुन? एकुलता एक लेक काळाच्या पडद्याआड जात असताना बघुन काय वाटत असेल त्या माऊलीली? बातमी समजताच पत्नी शितल अंथरुणालाच खिळवुन बसली आहे, तीन वर्षाच्या तान्ह्या मुलीला घेऊन आईच्या प्रत्येक हुंदक्याला आपल्या मुलाची आठवण बाहेर पडत आहे.येणार्या-जाणार्याकडे कावरेबावरे नजरेने बघणार्या वडीलांचा कंठ दाटुन येत होता.दररोज कित्येक घरे उध्वस्त होत असतील तर एकदाच त्या पाकाड्यांचा ठावठिकाना सरकार का लावत नाही असा सवाल शहीद संभाजींच्या वडीलांनी सरकारला केला......
असाच एक आघात नांदेड जिल्ह्यावर एप्रिल 2012 साली झाला होता.कुटुंबातील कर्ते व तरुण पोलिसांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.अर्धापुर येथील महेश डांगे अन् भोकर तालुक्यातील कोळगाव येथील पांचाळ माधव या अत्यंत विपरित परिस्थितीचा सामना करुन पोलीस झालेल्या युवकांचा अपघातातील शहीद होण्याची आठवण पुन्हा संभाजी कदमांच्या शहीद होण्याने उजागर झाली आहे.नांदेड येथील पोलिस दलाच्या फायर ग्राउंडवर झालेल्या
दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोन पोलिसांपैकी एक महेश
गोपीनाथ डांगे हा अर्धापूरचा रहिवासी. तर दुसरा माधव पांचाळ हा कोळगाव ता भोकर जि नांदेड येथील अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत जगणार्या घरातला कर्ता माणुस होता.
वयाच्या 18 व्या वर्षी सैन्यात भरती झालेल्या संभाजींकडे आपल्या जानापुरी गावात दिड एकर जमिन होती.आई-वडील,पत्नी,3 वर्षाची मुलगी, दोन बहीणी विवाहीत असलेल्या संभाजींचे आयुष्य एेन उमेदीत असतानाच काळाने घाला घातला.......
शेवटी......अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी... राहीली
💐🙏शहीदांना भावपुर्ण श्रद्धांजली🙏💐

No comments:
Post a Comment