शेवटी महाराष्ट्र नेऊन ठेवला मध्ययुगात!
पुन्हा लोकशाहीतच सत्तेला जातीयतेचा आधार
धनंजय गुंदेकर, बीड
अपूर्ण .... 9689043949
पुन्हा लोकशाहीतच सत्तेला जातीयतेचा आधार
धनंजय गुंदेकर, बीड
एकूण वातावरण, समाजातील संवाद, व्यवहार, चालचलन, चळवळ यांना बघून आज एक प्रश्न पडतोय या उद्योग, कला-क्रीडा संशोधन अन सामाजिकतेच्या बाबतीत पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची वाटचाल नेमकी कुठे होत आहे? या महाराष्ट्राच्या विकासाने देशाला महासत्तेचे स्वप्न दाखवले, देशाच्या प्रगतीत आजपर्यंत हातभार लावला त्याच महाराष्ट्राची आज वाटचाल हि मध्ययुगीन कालखंडात येऊन गुंतली आहे.या २०१६ च्या उत्तरार्धात एका दुष्कर्मानं अत्याचाराच्या विरोधात मूक प्रतिक्रिया मांडल्या.स्त्रीयांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात निघालेला हा मूक मोर्चा जातीयवादी बनवण्यात आला.या जातीयवादी(?) मोर्च्याचे संदर्भ देत काहींनी समाजांतर्गत दुफळी माजवण्याचा प्रताप सुरु केला.या समाजांतर्गत तणावाचे आज "मूक" पडसाद महाराष्ट्रातील प्रत्येक जण अनुभवतोय.महाराष्ट्र्रातील बहुसंख्य असणारा समाज एकाकी पाडण्यात काहींना यशहि आलेले आहे.
महाराष्ट्रातील जातीय वातावरण पेटून राजकीय सत्ता हस्तगत करण्याचा प्रताप आतापर्यंत कित्येकदा झालेलाच आहे.परंतु आताचे वातावरण हे आधीच्यापेक्षा प्रचंड कलुषित झालेले आहे.अल्पावधीत आपल्या पुरोगामी विचारला मुरड घालीत कित्येकजण जातीसाठी माती खायला लागले.पुरोगामित्वाची लक्तरं उडवायला काही लोक टपूनच बसले होते त्यांना त्यात यशही आले.या अशा जातीय प्रकरणाचा शेवट काय असेल ते माहित नाही परंतु वातावरण मात्र प्रचंड प्रदूषित झाले आहे.या अशा कारस्थानाचा कर्ता कोण आहे यापेक्षा याचा करविता हा "सत्ता" अन "राजकारण" आहे हे महत्वाचे आहे.
जातीय तेढातून मतपेटीचे राजकारण सहज सध्या आहे.राजकारणाची परिपूर्ण पॉलिसी ठरवणाऱ्या विचारवंतानी महाराष्ट्राच्या एकूण पुढील वाटचालीबाबत विचार करायला हवाच.उद्योग, व्यवसाय, कलाक्रीडा, संशोधनात अग्रेसर राहण्याबाबत धोरण ठरवायचे सोडून जातीय समीकरण कसे प्रबळ होईल याबाबत सध्या महाराष्ट्रातील काही पॉलिसी मेकर्स व्यस्त दिसून येत आहेत.आज महाराष्ट्रातील हुशार, कर्तव्यदक्ष, इच्छाशक्ती, धाडस असणारी जेमतेम उच्चशिक्षित तरुणांची डोकी जातीच्या नावाखाली भडकावण्यात आलेली आहेत.जातीच्या अन्यायाच्या बाबतीय न्याय मिळायलाच हवा.त्यासाठी काहीही दुमत नाही मात्र जातीच्या नावाखाली कायपण थोडेच पटणारे आहे.खरंतर जात नावाचा प्रकार माणसाला भेदभाव करायला लावतो.
आम्हीही याच्या प्रभावातून उत्साहित होऊन न पटणाऱ्या गोष्टींना समर्थन दिले आहे.अशाच प्रकारची ब्रेन वॊशिंग महाराष्ट्रातील युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात घडली आहे.याचा करविता कोणीही असो मात्र याच्या शेवटाबाबत त्या कारवित्यालाहि कल्पना नाही.आपण तर या खेळातील किडेमुंग्याच! याचा एकूण तोडगा काढणाऱ्या विचारसरणीची आज नितांत आवश्यकता आहे ज्यातून आज आपण काय करत आहोत याच्या संभ्रमातूनच जास्त अपराध घडण्याचे थांबेल.अजूनही खेळ हाताबाहेर गेलेला नाही!
अपूर्ण .... 9689043949

ekdam righat
ReplyDelete