सध्याच्या राजकारणात ..
विंचवाचे बिर्हाड पाठीवर
अन सच्चे कार्यकर्ते उष्ट्या वाटीवर
" राजकारणात कार्यकर्ते हे बागेतील शोच्या झाडासारखे वापरले जातात. हि झाडे वाजत गाजत लावली जातात. सुरुवातीची वाढ झपाट्याने व्हावी यासाठी खतपाणी घातले जाते. परंतु एकदा ती झाडे दोन-तीन फुटाची झाली कि त्यांना काटून (ट्रिमिंग) करून त्याला आहे तेवढ्याच उंचीचे ठेवले जाते. हे झाड मारू द्यायचे नाही, वाळू द्यायचे नाही आणि मारू तर अजिबात द्यायचे नाही अशी पद्धत वापरली जाऊन त्या बागेचे सुशोभीकरण सदैव राखले जाते यालाच सत्तेचे समीकरण म्हणतात" हे आतापर्यंत आपण कुठेतरी वाचलेच असणार मात्र यात आता अजूनही वाढ झालेली आहे. शेजारच्यांच्या बागेतील चांगली झाडे आपल्या बागेत आयती उचलून पहिल्या झाडांच्या शेजारी ठेऊन पोसली जातात मात्र पहिल्यापासून बागेचे सौन्दर्य खुलवणाऱ्या झाडांकडे दुर्लक्ष केले जाते. आता हेच होत आहे सध्याच्या राजकारणात!
![]() |
| राष्ट्रवादीने कारवाई केल्याने सुरेश धसांना आता भाजपचे फुल प्रपोस करत आहे. |
![]() |
| कट्टर कार्यकर्ते सदैव पाठीशी असतात अशा नेत्यांच्या तर पक्षांच्या विचारांनी प्रेरित एकनिष्ठेने पक्षाचा विचार करतात. |
राजकारणातला मित्र, नाटकातील पात्र आणि चित्रपटातील चित्र कधीच स्थिर नसतात, पण या सतत पलटणार्या नेत्यांमुळे सामान्य कार्यकर्त्यांचे हाल मात्र किती वाईट होवू शकतात याचा अनुभव बीड जिल्ह्याला लवकरच येईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. विधानसभेतील प्रभावी नेता या पक्षातून त्या पक्षात जातात तेव्हा पक्षाच्या तळमळीच्या कार्यकर्त्यांची जी वाताहत होते तिच्याकडे कोणीच पाहत नाही. कार्यकर्ता होणे म्हणजे उष्ट्यावर जाण्यासारखे झालेले आहे. वरच्या लेव्हलवर सर्व काही मॅनेज होऊन खाली पक्षवाढीसाठी केलेले निष्ठेचे प्रयत्नांवर पाणी सोडण्यात येते. पक्षवाढीसाठी करण्यात येणाऱ्या राजकीय कार्यातून आणि त्यांच्या यशातून जे राजकीय वैमनस्य तयार होते त्याच्या परिपाकाचे फलित त्या कार्यकर्त्यांनाच भोगावे लागते. पोलीस ठाण्यात अर्धे प्रकरणे राजकीय वैमनस्याचाच परिपाक असतात.

या पुढाऱ्यांच्या आदेशानुसार मारहाण, दंगल, मोर्चे काढले जातात .....

लोकमान्य, प्रसिद्ध राजकीय पुढारी जेव्हा इकडून तिकडे अन तिकडून इकडे येतात तेव्हा ते त्यांच्या पाठीवरच विंचवासारखे बिऱ्हाड घेऊनच राजकारणात धष्ट्पुष्ट होतात मात्र यात जो पक्ष, विचार, नेतृत्व, झेंडा बघत एकनिष्ठ असतो तो भरडला जाऊन शेवटी या अशा कार्यकर्त्यांच्या माथी उष्टी वाटीतलेच मारले जाते.
- धनंजय गुंदेकर - बीड 9689043949
at Beed ....


No comments:
Post a Comment