राष्ट्रवादी आघाडी'वर तर भाजप, सेना,
संग्राम, काँग्रेस सुस्तावलेलेच
राजकीय घडामोडींमध्ये आकर्षित करणाऱ्या बीड जिल्ह्यातील राजकीय वारे आणि राजकीय वावटळी कधीच थंडावत नाहीत याचा प्रत्यय राज्याला वारंवार येतच असतो. विधानसभेनंतर जिल्ह्यातल्या मुख्य पक्षांमधील पक्षनेतृत्वांच्या खांदापालटीनंतर जिल्हापरिषद, पंचायत समिती, बाजारसमित्यांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये पक्षातील पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचा आढावा पक्षश्रेष्ठींनी घेतलेलाच असेल. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप या पक्षांची जिल्ह्यात सरशी होती. मात्र राष्ट्रवादी पक्षाला जास्त मिळूनही त्या पक्षाला सत्ता स्थापन करता आली नाही ? जिल्ह्यातील नेतृत्व राज्यस्तरावर नेतृत्व करत असतानाही बहुमताने सत्ता भाजपाला मिळवता का नाही आली? राज्याच्या सत्तेत सहभागी शिवसेनेला गेवराई सोडता इतरत्र जी.प. चा एकही सदस्य निवडून आणता का नाही आला? जिल्ह्यातील या सर्व राजकीय गणिताचे तात्पर्य हे पक्षाच्या नेतृत्वबदलामध्ये दिऊन येते.
-----------------------------------------------------------------------------------
----------धनंजय गुंदेकर - बीड 9689043949------------
जिल्ह्यातील राष्ट्रीय नेतृत्व तथा भासंपचे विनायक मेटे यांच्या पक्षाने ४ जागा मिळवत आपले अस्तित्व सिद्ध केले मात्र निवडून आलेले जिप सदस्य व्यक्तिगतरीत्या मतदारांशी चांगले संभंध ठेऊन होते त्यामुळे त्यांचा विजय झाला अशीही चर्चा आहे. आ मेटेंची बीड विधासभेसाठी तयारी सुरु आहे मात्र येथील २ ते ३ सर्कलमध्ये त्यांना १ हजार मतांचा आकडाही पार करता आला नाही. शिवाय मेटे, मस्के या नावांशिवाय या पक्षात इतरांच्या मताची किंमतही धरली जात नसल्याने पक्षातील नेतृत्वाबद्दलासोबतच अधिकारप्राप्तीबाबतही कार्यकर्ते अपेक्षित आहेत.
बीड जिल्हा परिषदेच्या सभापतींमध्ये एक पद काँग्रेसकडे आहे. काँग्रेसचे सदस्य अत्यंत नगण्य असतानाही काँग्रेसचे सदस्य म्हणून त्यांना सभापतीपद मिळाले. देशात भाजपकडून काँग्रेसमुक्त भारताचे नियोजन चालू असताना मात्र जिल्ह्यात भाजपनियुक्त काँग्रेस सत्तेत सहभागी आहे. जिल्ह्यात काँग्रेसची कमालीची वाताहत झालेली असताना काँग्रेस पक्ष अंबाजोगाई आणि केज या भागातच केंद्रित झालेला दिसून येत आहे. जिल्ह्यातील निष्ठवंत काँग्रेसजनांना नेतृत्वातील बदल आवश्यक वाटत आहे मात्र गेल्या कित्येक निवडणूक आल्या आणि गेल्या काँग्रेस मात्र आहे तेथेच आहे.
एकूणच राष्ट्रवादीने धनंजय मुंडे, संदीप क्षीरसागर, महेंद्र गर्जे, बजरंग सोनवणे यांसारख्या नेतृत्वांना संधी देत पक्षात नवीन हुंकार भरला आहे. सत्ताधारी महायुतीतील पक्षांमध्ये सुस्तावलेपणा दिसून येत आहे. परिवर्तन हा आवश्यक नियम आहे हे समजून घ्यायला सत्ताधार्यांना बराच वेळ लागेल तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेलं असेल.
संग्राम, काँग्रेस सुस्तावलेलेच
राजकीय घडामोडींमध्ये आकर्षित करणाऱ्या बीड जिल्ह्यातील राजकीय वारे आणि राजकीय वावटळी कधीच थंडावत नाहीत याचा प्रत्यय राज्याला वारंवार येतच असतो. विधानसभेनंतर जिल्ह्यातल्या मुख्य पक्षांमधील पक्षनेतृत्वांच्या खांदापालटीनंतर जिल्हापरिषद, पंचायत समिती, बाजारसमित्यांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये पक्षातील पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचा आढावा पक्षश्रेष्ठींनी घेतलेलाच असेल. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप या पक्षांची जिल्ह्यात सरशी होती. मात्र राष्ट्रवादी पक्षाला जास्त मिळूनही त्या पक्षाला सत्ता स्थापन करता आली नाही ? जिल्ह्यातील नेतृत्व राज्यस्तरावर नेतृत्व करत असतानाही बहुमताने सत्ता भाजपाला मिळवता का नाही आली? राज्याच्या सत्तेत सहभागी शिवसेनेला गेवराई सोडता इतरत्र जी.प. चा एकही सदस्य निवडून आणता का नाही आला? जिल्ह्यातील या सर्व राजकीय गणिताचे तात्पर्य हे पक्षाच्या नेतृत्वबदलामध्ये दिऊन येते.
----------धनंजय गुंदेकर - बीड 9689043949------------
जिल्ह्यात सध्या ५ विधानसभांवर भाजपची सत्ता आहे तर राष्ट्रवादीच्या ताब्यात बीड विधानसभा आहे. जीपच्या निवडणुकांपूर्वी यावेळी जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात जाईल असा अंदाज बांधला जात होता. मात्र सत्ताधारी भाजपाला बाजूला सारत मतदारांनी राष्ट्रवादीच्या बाजूने झुकतं माप दिले. बहुमताच्या संख्याबळाच्या गणितात बंडखोरी आडवी आल्याने राष्ट्रवादीच्या तोंडचा घास भाजपने सेना, संग्राम, काँग्रेस, अन धसांच्या मदतीने हिरावून घेतला. या राजकीय घडामोडींमध्ये या एकूण निकालाचे विश्लेषण या पक्षांच्या अजेंड्यावर नव्हते मात्र बीड जिल्हा परिषदेच्या निवडीनंतर याची उलटतपासणी सुरु झाली. पाहिल्यान्दा राष्ट्रवादीतील नेतृत्वाचे वाद चव्हाट्यावर आले. यातून पक्षाच्या विधानसभावाइज अलिखित कराराला मोडीत काढण्यात आल्याचे दिसून येत आहे. धनंजय मुंडेंच्या बीड अन आष्टी-पाटोद्यातील एकदोन निर्णयावरून जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीतील युवा नेतृत्वांना दिलेल्या संधीने जिल्ह्यातील पक्षाकडे आकर्षित होत आहे. राष्ट्रवादीत पक्षाचे हित बघितले जात असल्याचे दाखवून देण्याचा यातून प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.
याउलट जिल्ह्यातील भाजपच्या जिप निवडणुकीतील एकूण परफॉर्मन्सवर सत्ताप्राप्तीच्या झालरीने पांघरून टाकले असले तरी मात्र भाजपाला आपल्या नेतृत्वात बदल करणे गरजेचे असल्याचे भाजपच्या समर्थकांमधून परिवर्तनाचे सूर निघत आहेत. भाजपाकडे आकर्षित होत असलेल्या नव्या दमाच्या कार्यकर्त्यांची कदर या पक्षात होत नसल्याने पक्षनेतृत्वातील पदाधिकाऱ्यांवर स्पष्ठपणे नाराजी व्यक्त करण्याचे सत्र सुरु आहे. ना पंकजा मुंडेंचे नेतृत्व व मुंडे साहेबांवरची निष्ठाच अजूनही कार्यकर्त्यांना आणि मतदारांना भाजपशी बांधून ठेऊन आहे. मात्र मतदार व नेतृत्व यांची नाळ जोडून दुवा साधणाऱ्या पदाधिकाऱयांचे परिवर्तन गरजेचे असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात एकेकाळी ४ विधासभांवरुन निवडणूक लढणारी शिवसेना आता बीड विधासभेपुरती सीमित झालेली आहे यातही परळीच्या भाजपचे आणि बीडच्या राष्ट्रवादीचे सख्य सर्वश्रुत असल्याने येथे शिवसेनेला स्वतःच्याच बळावर लढावे लागत असे. अश्यातच गेवराईतून बदामराव पंडितांनी सेनेचे शिवबंधन स्वीकारल्याने बीड जिल्हा परिषदेच्या आखाड्यात शिवसेनेला ४ जागा मिळवता आल्या. परंतु बालेकिल्ला असणाऱ्या बीड विधानसभेत शिवसेनेची विकेट शून्यावरच पडली. शिवसेना गेल्या १० ते १२ वर्षांपासून एकच पक्षनेतृत्व सांभाळून आहे. जिल्ह्यातील शिवसेना कोमात आणि इतर ठिकाणी जोमात म्हणण्याची वेळ येथील शिवसैनिकांवर आलेली आहे. शिवसेनेची पत आज जरी गेवराईतून राखली गेली असली तरी ती पत बदामराव पंडितांच्या वयक्तिक मतांतून होती. बाकी जिल्हाभरातील शिवसेनेचे पदाधिकारी, दोन्ही जिल्हाध्यक्ष काय करतात? हा प्रश्न आता शिवसैनिकांकडूनच उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीय नेतृत्व तथा भासंपचे विनायक मेटे यांच्या पक्षाने ४ जागा मिळवत आपले अस्तित्व सिद्ध केले मात्र निवडून आलेले जिप सदस्य व्यक्तिगतरीत्या मतदारांशी चांगले संभंध ठेऊन होते त्यामुळे त्यांचा विजय झाला अशीही चर्चा आहे. आ मेटेंची बीड विधासभेसाठी तयारी सुरु आहे मात्र येथील २ ते ३ सर्कलमध्ये त्यांना १ हजार मतांचा आकडाही पार करता आला नाही. शिवाय मेटे, मस्के या नावांशिवाय या पक्षात इतरांच्या मताची किंमतही धरली जात नसल्याने पक्षातील नेतृत्वाबद्दलासोबतच अधिकारप्राप्तीबाबतही कार्यकर्ते अपेक्षित आहेत.
बीड जिल्हा परिषदेच्या सभापतींमध्ये एक पद काँग्रेसकडे आहे. काँग्रेसचे सदस्य अत्यंत नगण्य असतानाही काँग्रेसचे सदस्य म्हणून त्यांना सभापतीपद मिळाले. देशात भाजपकडून काँग्रेसमुक्त भारताचे नियोजन चालू असताना मात्र जिल्ह्यात भाजपनियुक्त काँग्रेस सत्तेत सहभागी आहे. जिल्ह्यात काँग्रेसची कमालीची वाताहत झालेली असताना काँग्रेस पक्ष अंबाजोगाई आणि केज या भागातच केंद्रित झालेला दिसून येत आहे. जिल्ह्यातील निष्ठवंत काँग्रेसजनांना नेतृत्वातील बदल आवश्यक वाटत आहे मात्र गेल्या कित्येक निवडणूक आल्या आणि गेल्या काँग्रेस मात्र आहे तेथेच आहे.
एकूणच राष्ट्रवादीने धनंजय मुंडे, संदीप क्षीरसागर, महेंद्र गर्जे, बजरंग सोनवणे यांसारख्या नेतृत्वांना संधी देत पक्षात नवीन हुंकार भरला आहे. सत्ताधारी महायुतीतील पक्षांमध्ये सुस्तावलेपणा दिसून येत आहे. परिवर्तन हा आवश्यक नियम आहे हे समजून घ्यायला सत्ताधार्यांना बराच वेळ लागेल तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेलं असेल.


बीड जिल्ह्याच्या राजकीय परिघात नेतृत्वबदलाचे वारे
ReplyDeleteराष्ट्रवादी आघाडी'वर तर भाजप, सेना,
संग्राम, काँग्रेस सुस्तावलेलेच