संघाच्या भाजपात प्रवेशासाठीही अडथळ्यांची शर्यत
आक्रमक अन महत्वाकांक्षी राणे, सुरेश धसांच्या
राष्ट्रवादीची गटबाजी भाजपामध्ये हस्तांतरित होत असल्याचे चित्र जवळपास निश्चित दिसत असताना खुद्द भाजप मध्ये यावर काळजी व्यक्त करत काही भाजपेयीं येणाऱ्या पाहुण्यांना लक्ष्मण रेषा आखण्याची तयारी करत आहे , अन राजकीय भविष्य निर्वाह म्हणून मूळ भाजपेयीं यांनी ही घेतलेली काळजी होय. सध्या महाराष्ट्रात राणे आणि धसांच्या बाबतीत तेच घडत आहे .
आक्रमक अन महत्वाकांक्षी नेतृत्व म्हणून ओळख असणाऱ्या नारायण राणे आणि सुरेश धस यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्च्या महाराष्ट्रभर चर्चिल्या जात आहेत. गेल्या महिनाभरापासून राज्यात नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत चंद्रकांत पाटलांपासून ते पक्षाध्यक्षपर्यंत निरोप पोहोचलेले आहेत तर मराठवाड्यातल्या बिडात सुरेश धसांनी तर जिल्हा परिषदेची राष्ट्रवादीशी बंडोबा करत तोंडातली सत्ता काढून तिला भाजपाकडे बहाल केले आहे. या मातब्बर नेत्यांच्या भाजपात दाखल होण्याबाबत सुरुवातीला जरी अनुकूल वातावरण दिसत होते तरी मात्र आता भाजपातूनच एका गटाचा विरोध होत असल्याचे दिसून येत आहे.
भाजपा पक्ष हा हिंदुत्ववादी विचारसरणी अनुसरून आहे. पार्टी विथ डिफरंन्स हि ओळख असणाऱ्या पक्षात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत विजयासाठी इतर पक्षातील नाराजांना आणि बंडोबांना तिकीट व प्रवेश देण्यात आले. यावर भाजपने सत्ता हि मिळवली. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही तोच फॉर्मुला वापरण्यात आला. भाजपाला याचा अपेक्षित लाभही झाला मात्र आता देशभरात एकहाती सत्ता मिळवल्यानंतर सत्तेच्या आकर्षणातून जवळीकता साधणारे "बाहुबली" नेतृत्वे भाजपेयी विचारसरणीच्या एका गटास आता नकोसे झाले आहेत. हिन्दुत्व आणि संघीय संस्काराच्या बाहेर जडणघडण झालेल्या नेतृत्वांबाबत जेष्ठ आणि कट्टर संघीय विचारसरणीच्या गटास आक्रमक आणि महत्वाकांक्षी बंडोबा भाजपात नकोसे आहेत.
बीड जिल्हापरिषदेत राष्ट्रवादीशी बंडोबा करणाऱ्या धसांना भाजपातील प्रवेशाचा अजूनही मुहूर्त लागेनासा झाला आहे. मछिंद्र गडाचे ट्रस्टी असणाऱ्या धसांना आता भाजपा प्रवेशासाठी गोरखपूरच्या नाथ मंदिराचे ट्रस्टचे ट्रस्टी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी नाथ पंथाचा दुआ साधत प्रवेश करण्यासाठी लॉबिंग करण्याची वेळ आली आहे तर शिवसेना, काँग्रेस असा प्रवास असणाऱ्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या आक्रमकता आणि महत्वाकांक्षी स्वभावाला जाणून भाजपकडून प्रवेशाबत अडथळ्यांची शर्यतच उभेही करण्यात आली आहे. यातून भाजपाच्या पक्षीय धोरणातील दूरगामी विचारसरणी दिसून येत आहे. या पक्षात विचारांना अजूनही स्थान असून पक्षनेतृत्व, संघ या सर्व गोष्टीचा येथे सारासार विचार आजही केला जातो हे दिसून येते.
नारायण राणे आणि सुरेश धस आजपर्यंतच्या एकूण राजकीय कार्यकीर्दीत व्यक्तिकेंद्रित राजकारणाबाबत ओळखले जातात. या दोन्ही नेत्यांनी आतापर्यंत पक्षांतरात काहीतरी पदरी पडून घेतलेले आहे. स्वतःच्या मताचा गट्ठा हे आपल्या पाठीशीच घेऊन चालत असतात अशा नेत्यांच्या भाजप प्रवेशाने तेथे भाजपच्या किंवा संघाच्या विचारांचा कसलाही प्रसार न होता तेथील कार्यकर्ते नुसता झेंडा बदलणार आहेत. हे भाजपातल्या काही तज्ञ लोकांना लक्षात येत असल्याने यांच्या प्रवेशाबाबत आता अशा लोकांकडून अडथळा निर्माण केला जात आहे, कारणही तसेच आहे देशात एकहाती सत्ता मिळवताना विविध पक्षांच्या आणि विचारसरणीच्या लोकांना जवळ केल्याने आता सत्तेचा गाडा हाकताना या भाजपेयी लोकांना या लोकांचाच त्रास होऊ लागला आहे. पहिलाच कमी नाही कि त्यामुळे यात आता अशा आक्रमक आणि महत्वाकांक्षी लोकांची भर नको असे म्हंटले जात आहे. यामुळे इथून पुढे भाजप प्रवेशासाठी आपण कधीनाकधी संघाच्या अर्ध्या चड्डीत शिक्षण घेतलेले आवश्यक आहे. हे हि लक्षात असू द्या. जर भाजपने याची जाण नाही ठेवली तर राष्ट्रवादीप्रमाणेच भाजपातही गटबाजीस प्रारंभ होईल आणि ती सुरुवात अशाच नेत्यांकडून असेल.
धनंजय गुंदेकर, बीड 9689043949

"स्वतःच्या मताचा गट्ठा हे आपल्या पाठीशीच घेऊन चालत असतात" असं प्रतिपादन तुम्ही राणे आणि धस यांच्याबाबत करता तर मग नारायण राणे यांचा विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव कसा काय झाला आणि तोही वेगवेगळ्या मतदार संघात ?
ReplyDeleteRight
ReplyDelete