संघर्षशील नेतृत्वाची मात्र विकासात्मक भरारी
व्यक्तिविशेष
एखाद्या नेतृत्वावर गल्ली ते दिल्ली आरोप होतात, पक्षांतर्गत राजकारणात पाण्यात पहिले जाते, विरोधकांकडून घरातच कडवा विरोधक उभा केला जातो, मनातील अपेक्षा बोलून दाखवल्याने प्रसारमाध्यमांच्या तोफेसमोर पदोपदी उभे केले जाते मात्र संघर्षाच्या वारसदार या अशा आरोपांच्या फैरींचा, अतार्किक विरोधाचा कणखरपणे सामना करत आपल्या बेजोड नेतृत्वाच्या जोरावर विकासात्मक भरारी घेते. या भरारीच्या अवाढव्यतेने राज्यसकट देशभरात वाहवा मिळून सृजनशील कार्याची दखल अनुकरणीय ठरते तेव्हा मात्र त्या नेतृत्वाची भरारी नेत्रदीपक ठरते. या यशासोबतच येते स्पर्धा आणि या स्पर्धेतून पुन्हा उभा राहतो अव्याहत संघर्ष.
जनकल्याणाच्या वसा आणि वारसा जपणाऱ्या ना पंकजा मुंडे आणि खा प्रीतम मुंडेबाबत आता हेच घडत आहे. विधानसभा आणि आपल्या मंत्रालयातील खात्यांमध्ये विविध योजनांची उत्कृष्ट अंमलबजावणी करत सकारात्मक विकासाची कास धरणाऱ्या ना पंकजा मुंडे आणि लोकसभेत अभ्यासपूर्ण विषयाची मांडणी करत रखडलेल्या आणि अत्यावश्यक प्रश्नांवर लक्षवेधीतून सरकारला उपाययोजना करण्यास भाग पडणाऱ्या खा प्रीतम मुंडे यांच्या या संघर्षाच्या समर्थ वारसाला आता घरघर लागली आहे विविध आरोपांची. यात काही तथ्यहीन आरोपांनी नाहक बदनामी घडवून आणत प्रभाव कमी करण्याचा कुटील डाव विरोधकांकडून खेळला जात आहे. विरोधकांनी विरोध करताना काही आचारसंहिता असते मात्र महिला म्हणून विरोध करताना हि आचारसंहिताही पाळली गेली नाही. तथ्य असलेल्या गोष्ठीचा विरोधही स्वागतार्ह आहे मात्र तथ्यहीन विरोध विरोधकांनाच निष्प्रभ करत आहे.
राज्यशासनाच्या मंत्री असणाऱ्या ना पंकजा मुंडेंनी कोणत्या प्रकरणांवर बोलावे हे त्यांच्या स्थानावर अवलंबून आहे. मात्र राणा डोईफोडे सारख्या मुलींच्या छेडछाड प्रकरणात त्यांनी प्रतिक्रिया द्यायलाच हवी कारण हे प्रकरण त्यांच्या जिल्ह्यातील आहे आणि त्या महिला व बालकल्याण विकास मंत्रीही आहेत. मात्र त्यांनी आताच प्रतिक्रिया द्यावी तेही नाही. आरोप सिद्ध होतील तेव्हा त्यांना या प्रकरणातील आरोपींची दाखल घ्यावीच लागेल. त्यांच्या नावाचा वापर गुन्ह्यांसाठी होत असेल तर अशा लोकांवर कडक निर्बंध लादत त्या नक्कीच कारवाईही करतीलही.
उत्तर प्रदेशचे नवनिर्वाचित सरकार ना पंकजा मुंडेंच्या ३ योजनांची अंमलबजावणी त्यांच्या राज्यात करण्यास उत्सुकता दाखवते. त्यातला जलयुक्त शिवार यिजनेच्या अंमलबजावणीविषयी उत्सुकता दाखवते, 'अस्मिता' योजनेतील सृजनशीलतेला नवाजते, महिला बचत गटांच्या विकासासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणाऱ्या सुमतीताई सुकळीकर योजनेच्या अमलबजावणीबाबत उत्सुकता दाखवत महिलांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रणही देते. या सर्व प्रवासात ना पंकजचे नेतृत्व, योजनांची अंमलबजावणी, अभ्यासूपणा, तत्परता या राज्याबाहेरील लोकांना दिसून येते मात्र राज्यातीलच याच योजनांचे लाभधारक पंकजांना दुसने देण्यास कचरत नाहीत. आजकाल प्रसारमाध्यमानीच निष्प्रभ विरोधीपक्षांच्या हतबलतेपुढे विरोधाचे सूत्रे हाती घेतल्याने केलेल्या कामाची दाखल घेतली जात नाही, मात्र एखाद्या आपची नेता ४ कागदे हातात घेऊन माझ्याकडे ना पंकजांच्या भ्र्रष्टाचाराची पुरावे आहेत म्हंटले कि दिवसभराची ब्रेकिंग बनते. हि ब्रेकिंग का बनतेय तर आजघडीला सर्वच ठिकाणी मुत्सद्दीपणे तोंड देत आपल्या विकासाच्या कार्याचा रथ जोरात चालवणाऱ्या पंकजांना कुठेतरी आडकाठी यावी यासाठी.
या आणि अशाच प्रकरणातून आज बीड जिल्ह्याचे नेतृत्व तावून-सुलाखून निघत आहे. इतकी कृत्रिम नकारात्मकता बनवली जात आहे मात्र यातून सकारात्मक निकाल लागत आहेत आणि हि किमया या संघर्षमय नेतृत्वची आहे म्हणूनच आजही जिल्हा विकासाच्या दिशेने दिवसेंदिवस भक्कमपणे आपली पायाभरणी करत आहे. *आजघडीला जिल्ह्याला जे नेतृत्व लाभले आहे असे नेत्रत्व पुन्हा जिल्ह्यास लाभणार नाही. आज जर ना. पंकजाविना जिल्हा बघितला तर विरोधकांनाही काहीच किंमत राहणार नाही. बीड जिल्ह्याचा जो विकास होत आहे तो पुन्हा खुंटला जाईल. बीडचा बुलढाणा होईल आणि आपण पुन्हा मागासलेपणाचा शिक्का उजळ माथ्यावर घेऊन आपल्या कर्मास दूषणे देण्याव्यतिरिक्त काहीही करू शकणार नाहीत*. माझे असे म्हणणे नाही कि "या नेतृत्वास आपण स्वीकारा" हा ज्याचा त्याचा प्रश्न राहिला. मात्र या नेतृत्वाची कदर आपण करायलाच हवी. बहुजन समाजातील ना पंकजा मुंडे, खा प्रीतम मुंडे , आ विनायक मेटे या सारखी नेतृत्वे जिल्ह्याच्या भरभराटीसाठी आवश्यक आहेत. जळी-स्थळी-काष्ठी विरोध करून नेतृत्वास झळाळी येते, नेतृत्वाचा असत होत नाही.
धनंजय गुंदेकर पाटील बीड 9689043949



एखादा पुढारी त्याच्या कर्तव्यास जागला म्हणजे तो जनतेवर उपकार करत नसतो , मंत्री म्हणून उपलब्ध असणार्या सुविधा जनतेच्या वायद्यातून पुरवल्या जात असतात , हा प्रकार म्हणजे सालगडी साल घेऊन काम करण्याचा उपकार सांगतो असा आहे , विकासाचा परिपाठ लिहताना सामाजिक अभिसरण नावाची बाब आपल्याकडून चुकत असेल तर त्याचे नुकसान सहन करावे लागते . लेखकाचे कौतुक आहे दुसरी बाजू चांगली मांडली आहे मात्र पहिल्या बाजूचे अनेक पैलू उघडणे गरजेचे आहे
ReplyDelete